महापालिकेच्या चुकीमुळे चिमुरडा वाहून गेला?

15

सामना ऑनलाईन । उल्हासनगर

उल्हासनगर येथील वडोळगावात राहणारा गणेश जैसवार हा अवघ्या सात वर्षांचा चिमुरडा वालधूनी नदीत पडून वाहून गेला. या घटनेमुळे साऱ्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वालधूनी नदी पात्राच्या साफसफाईचे कारण देत किनाऱ्यावर कचऱ्याचे ढिग उभे करण्यात आले आहे. याच परिसरात राहणारा गणेश मंगळवारी संध्याकाळी खेळत असताना किनाऱ्यावर पोहोचला आणि पाण्यात बुडाला. त्यानंतर आज सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह हाती अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला. स्थानिकांनी या घटनेसाठी पालिकेला जबाबदार धरले आहे. पालिकेने सेफ्टी वॉल उभी करण्याऐवजी साफसफाईच्या नावाखाली कचऱ्याचे ढिग उभे करून तसेच सोडून दिल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या