लातूरात अल्पवयीन मुलाचे अपहरण

31
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी । लातूर

येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलाची आई सिमीता विठ्ठल कांबळे यांनी तक्रार दिली आहे. शुभाष विठ्ठल कांबळे (वय १२) यास अज्ञाताने घरातून बोलावून घेऊन गेले. त्यानंतर तो परत आलाच नाही. सगळीकडे शोध घेतला पण कुठेच ठावठिकाणा सापडाला नाही, शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ४ दिवसापासून तो परत आला नाही या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक मिलींद खोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आर.के. निलंगेकर पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या