फोटोच्या साहाय्याने बनू शकतो व्हिडिओ

32
सामना ऑनलाईन । मुंबई
तुमच्या फोटोच्या माध्यमातून तुमचा व्हिडिओ बनू शकतो. हो..हे खरं आहे.. ऑक्सफर्ड येथील शास्त्रज्ञांनी एका नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे. हे तंत्रज्ञान एखाद्या व्यक्तिच्या चेहऱ्याचे फोटो आणि आवाज यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला एखाद्या व्हिडिओत मॉर्फ करू शकतं.
इतकंच नव्हे तर, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या तोंडाची हालचालही रेखाटता येते. जेणेकरून संबंधित व्हिडिओच्या आवाजाशी लिपसिंक करता येईल. यामुळे व्हिडिओत प्रत्यक्ष ती व्यक्तीच बोलत असल्याचा आभास निर्माण होतो.
हे तंत्रज्ञान विशेषतः बहुभाषीय चित्रपटांमध्ये डबिंगसाठी वापरलं जातं. भविष्यात एखाद्या बातमीची ऑडिओ क्लिप एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या साहाय्याने ऐकवली जाऊ शकते. पण, जर हे चुकीच्या माणसांच्या हातात पडलं तर मात्र अनेक समस्या उद्भवू शकतात.
आपली प्रतिक्रिया द्या