
पालिका निवडणुकीच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार सध्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. मात्र यापूर्वी आपण जनतेला कोणती आश्वासने दिली होती याचा अनेक उमेदवारांना विसर पडला आहे. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे प्रभाग क्र. 206 मधील उमेदवार सचिन पडवळ यांनी अनोखी संकल्पना लढवली आहे. यापूर्वी आपण प्रभागातील जनतेला कोणती आश्वासने दिली होती त्यातील किती पूर्ण केली अशा आपल्या कामाचा लेखाजोखाच त्यांनी चक्क क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या अनोख्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





























































