Video : घरासमोरील 3 चारचाक्या धडका देऊन उडवल्या, पुण्यातील महिलेचा प्रताप

1232

पुण्यामधील एका कारद्वारे जाणूनबुजून दुसऱ्या कारला टक्कर मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील रामनगर भागात महिला ड्रायव्हरने जाणूनबुजून दुसऱ्या कारला धडका दिल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट, 2019 रोजीचा हा व्हिडीओ आहे. यात एक महिला ड्रायव्हर घरासमोर उभ्या असणाऱ्या कारला आपल्या कारने धडका देऊन नुकसान करताना दिसत आहे. महिलेने एक नाही तर तीन कारला अशा धडका दिल्या. यावेळी आजूबाजूनला असणाऱ्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. परंतु सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याते त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या