किपरचे ग्लोव्हज घालून बॉल पकडला; पाच रन्सची पेनल्टी!

16

सामना ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या जेएलटी शिल्ड क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहे. या टुर्नामेंटमधील एका सामन्यात क्विन्सलँडव बुल्सच्या संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला २११ रन्सनी हरवले असले तरी हा सामना वेगळ्याच घटनेमुळे गाजला. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मॅट रेनशॉ याने फिल्डिंगच्या वेळी केलेल्या चुकीमुळे या संघाला पाच रन्सची पेनल्टी पंचांनी ठोठावली.

क्विन्सलँडव संघाच्या बॅटस्मनने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारला. तो फटका अडविण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर प्रियर्सन तो बॉल पकडण्यासाठी धावला. यावेळी त्याने आपले ग्लोव्हज काढून तिथेच टाकले. यावेळी स्लिपमध्ये उभा असलेल्या रेनशॉ याने प्रियर्सनने केलेला थ्रो पकडण्यासाठी ते ग्लोव्हज घातले. त्याने तो थ्रो पडकलाही. पण ग्लोव्हज घालून पकडलेला तो थ्रो पंचांच्या नजरेतून सुटला नाही. हा व्हिडीओ मीडियावर व्हायरल झाल्याने रेनशॉचे मात्र हसू झाले.

आपली प्रतिक्रिया द्या