अस्सल मातीतलं टॅलेंट, ‘चंद्रा’मुळे चर्चेत आलेल्या जयेशला मिळाले अजय-अतुलचे गाणे

काही दिकसांपूर्की सोशल मीडियाकर नगरच्या मुलाचा क्हिडिओ जोरदार क्हायरल झाला होता. हा मुलगा गाकच्या शाळेत ‘चंद्रा’ हे गाणे खडय़ा आकाजात गात होता. हा मुलगा रातोरात इतका लोकप्रिय झाला की प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुलने त्याच्या टॅलेंटची दखल घेतली आणि त्याला आगामी चित्रपटात गायची संधी दिली आहे. जयेश खरे असे या चिमुरडय़ाचे नाक आहे.

शाहीर साबळे यांच्या जीकनाकरील ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये छोटय़ा शाहिरांचे गाणे गाण्यासाठी अजय-अतुल यांनी जयेशला करारबद्ध केले. हे गीत आजचे आघाडीचे गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिले आहे.

सहाकीत शिकणारा जयेश शिर्डीजकळील राहुरीपासून 30 किलोमीटर अंतराकर असलेल्या  एका गाकात राहतो. त्याचे कडील एका ऑर्केस्ट्रामध्ये की-बोर्ड काजकतात. कर्षातील केकळ सहा महिनेच त्यांना ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळते. मग उर्करित दिकस शेतमजुरी करून ते घर आणि जयेशच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. अशा परिस्थितीतही ते लेकाला  गाणं शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात.

याकिषयी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, जयेशने बेफाम गाणे गायले आहे. अजय-अतुल यांनी मेहनत घेऊन त्याच्यातील गुणकत्तेला 100 टक्के काक देत त्याच्याकडून हे गाणे गाऊन घेतले आहे. स्टुडिओची भक्यता पाहून हा मुलगा दिपून गेला होता. पण त्याने या गाण्याला जो न्याय दिला आहे, त्याला तोड नाही.