गाडीला ठोकले म्हणून तरुणीने तरुणाला रॉडने बदडले, व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । चंदिगढ

चंदिगढमध्ये एका तरुणीच्या गाडीला ठोकल्याने त्या तरुणीने एका तरुणाला शिवीगाळ करत रॉडने मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी त्या महिलेला अटक करण्यात आला आहे.

चंदिगढमधील ट्रिब्यून चौकात ही घटना घडली आहे. सदर तरुण ट्रिब्युन चौकातून जात असताना त्या तरुणाच्या सॅन्ट्रोने महिलेच्या गाडीला ठोकले. त्यामुळे संतापलेल्या त्या महिलेने तिच्या गाडीत ठेवलेल्या रॉडने त्या तरुणाला मारगाण केली. तसेच त्याच्या गाडीचे देखील नुकसान केले. या प्रकरणी त्या तरुणीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरुणीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.