मुलगी झाली हो…  हत्तीवरून मिरवणूक काढत लेकीचे स्वागत  

मुलगी नको, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे, अशी अनेकांची मानसिकता आहे. मात्र स्त्राr जन्माचे थाटामाटात स्वागत करत कोल्हापूरमधील पाटील कुटुंबाने समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे. मुलीच्या जन्मामुळे अत्यानंद झालेल्या गिरीश पाटील यांनी चक्क ढोलताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात लेकीची हत्तीवरून मिरवणूक काढून जंगी स्वागत केले.   

कागल तालुक्यातील पाचगाव येथील गिरीश पाटील आणि मनीषा पाटील या दांपत्याला पाच महिन्यांपूर्वी कन्यारत्न झाले. बाळ मोठे झाल्यावर मनीषा पाटील सासरी परतल्या. त्या वेळी गिरीश पाटील यांनी हत्तीवरून मिरवणूक काढत लेकीचे जंगी स्वागत केले. पाचगावमधील शांतीनगरमधील ओम पार्क ते ढेरे मल्टीपर्पज हॉल या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी बच्चेपंपनीला वेगवेगळय़ा वेशभूषेत नटवण्यात आले. स्वागतासाठी ढोलताशा आणि मर्दानी खेळांचे आयोजन केले होते. मिरवणुकीत बेटी बचाओबेटी पढाओ असा सामाजिक संदेश देण्यात आला. या जंगी मिरवणुकीची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.