कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह; 13 वर्षांच्या मुलीला ‘कोरोना लेग’ चे विचित्र संक्रमण

कोरोनाचा व्हायरस स्वरुप बदलत असल्याने कोरोनाची वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहेत. याबाबत संशोधक अभ्यास करत आहेत. एका मुलीला विचित्र प्रकारचे कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे डॉक्टरही चक्रावले आहेत. या मुलीला कधीही कोरोना झालेला नाही. तिचे कोरोनाचे अहवालही निगेटिव्ह आहेत. मात्र, तिच्या पायांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे.

स्कॉटलँडमधील 13 वर्षांच्या सोफिया नावाच्या मुलीला कोरोनाचे विचित्र संक्रमण झाले आहे. तिचे कोरोनाबाबतचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच तिला याआधी कधीही कोरोना झाला नव्हता. तरीही तिच्या पायांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तिच्यात दिसणारी सर्व लक्षणे कोरोनाचीच असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोनााबाधित झाली नसताना तसेच अहवाल निगेटिव्ह असतानाही फक्त तिच्या पायांनाच कोरोना संक्रमण कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे डॉक्टरही चक्रावले आहेत. डॉक्टरांनी सोफियाला कोरोना लेग संक्रमण झाल्याचे सांगितले.

सोफिया गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांपर्यंत अभ्यास, नाच, गाणे खेळणे यात गुंतली होता. मात्र, ऑक्टाबरनंतर तिला पायांचा त्रास जाणवू लागला. तिला चालणेही कठीण झाले. पायांना लालसर रंगाचे चट्टे आणि फोड येत होते. त्यामुळे तिला वेदना होत होत्या. कोरोनबाधितांमध्ये ही लक्षणे आढळत असल्याने डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर तिचा त्रास वाढतच गेला.

पायाला चट्टे आणि फोड येण्यासाह सूज येण्यासही सुरुवात झाली. हे चट्टे आणि फोड लालसर, गुलाबी आणि फिकट निळ्या रंगात बदलत असल्याचे तिने सांगितले. तसेच तिच्या तळपायाला गाठ आल्याने तिला उभे राहणेही कठीण झाले. डॉक्टरांनी सांगितलेल्या विशेष अशा फ्लिपफ्लॉप बुटांशिवाय तिला दुसरे बूट वापरता येत नाहीत. हे बूट घातले नाही तर तळपायांना वेदन होत असल्याचे तिने सांगितले.

ही सर्व कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यात पायांना चट्टे येतात. ते लालसर गुलाबी आणि फिकट निळ्या रंगाचे होतात. तसेच काहीजणांना फोडही येतात. कोरोनाबाधित झाल्यावर काहीजणांमध्ये ही लक्षणे आढळली आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांमध्ये ही लक्षणे 4 ते 5 महिन्यांपर्यंत राहातात. त्यानंतर ती कमी होतात. तसेच कोरोनामुळे त्वजेच्या समस्या होत असल्याचेही दिसून आले आहे.

सोफियाला होणारा त्रास आणि लक्षणे सर्व कोरोनाशी संबधित आहेत. मात्र, तिचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे फक्त तिच्या पायांनाच कोरोनाचे संक्रमण झाले आहे. ही लक्षणे कधीपर्यंत राहतील, हे सांगणे कठीण आहे. सोफियाचा त्रास कमी करण्यासाठी उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना लेगची अशी पहिलीच समस्या निदर्शनास आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कोरोना संक्रमण आणि त्वचाविकार याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या