ओवेसींच्या छाताडावर हिंदू राष्ट्र बनणार, घरासमोर तरुणाची घोषणाबाजी

28

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या निवासस्थानाबाहेर काही तरुण हिंदू राष्ट्राच्या घोषणा देत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ”हिंदू राष्ट्र बनणार आणि ओवेसीच्या उरावर चढून बनणार, हिंदू राष्ट्र बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही”, अशा घोषणा करताना एक तरुण या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसंच, तोलोकसंख्या नियंत्रणाची मागणी करत आहे. त्याच्यासोबत असलेले इतर तरुण ‘गद्दार ओवेसी मुर्दाबाद’ ‘वंदे मातरम’ जय श्रीराम अशा घोषणा देत आहेत. हा व्हिडीओ एका फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून शेअर करण्यात आला आहे.

या घोषणाबाजीनंतर ओवेसी यांच्या घराबाहेर तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला गेला. या दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या पोलिसाने रोखण्याचा प्रयत्न केला असता घराबाहेर असलेल्या बोर्डवर शाई फासण्यात आली आणि तो बोर्ड काढून टाकण्यात आला. या दरम्यान ओवेसी यांच्या घराच्या गेटवरही शाईफेक करण्यात आली. या व्हिडीओमध्ये दिसणारा एक तरुण सुदर्शन या वृत्तवाहिनीचे मालक सुरेश चव्हाणके यांना हैदराबादमध्ये थांबवण्यात आल्याचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याचं सांगत आहे. त्याचाच विरोध म्हणून या तरुणांनी ओवेसी यांच्या घरावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या