राहुल गांधींना ‘न्यू इंडिया’ महागात पडणार, तक्रार दाखल

6
rahul-gandhi-sad

सामना ऑनलाईन । मुंबई

जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘न्यू इंडिया’ अशा कॅप्शनसह लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

योगदिनावेळी राहुल गांधी यांनी लष्कराच्या डॉग युनिटचा फोटो ट्वीट केला होता. त्याला ‘न्यू इंडिया’ अशी कॅप्शन देखील दिली होती. अनेकांनी या राहुल गांधी यांच्या त्या ट्वीटवर आक्षेप घेत हा हिंदुस्थानची थट्टा उडवण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता अॅड. अटलबिहारी दुबे यांनी राहुल गांधीच्या ट्वीटविरोधात तक्रार नोंदवली आहे.