जळगाव: उष्माघाताने घेतला तरुणाचा बळी

17

सामना प्रतिनिधी । पारोळा

जळगावमधील पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथे उष्माघाताने एका ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्यासह देशात उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे.

तुकाराम सांडू पाटील हा नेहमीप्रमाणे सकाळी शेतात जाण्यासाठी तयारी करत असताना अचानक चक्कर येवून डोळे लाल झाले आणि उलट्या होवू लागल्या. त्याला तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात हलविले. मात्र तेथे तपासणी झाल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

उन्हाचा पारा ४२ अंशावर गेलेला असतांना तुकाराम हा सकाळपासून दुसऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जात होता. सतत पाच दिवस उन्हात काम केल्याने त्याच्या प्रकृतीवर परिणाम होऊन उष्माघाताने मृत्यू झाला.

तुकारामच्या घरची परिस्थिती बिकट असून आई वडील, पत्नी, ५ वर्षाची मुलगी व दोन वर्षाचा मुलगा असा त्याचा परिवार होता. तुकारामवर आज दुपारच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या