चटणीमुळे त्यांची रेल्वेखाली चटणी झाली असती

41

सामना ऑनलाईन । मुंबई

परळ रेल्वे स्थानकात लोकल पकडताना एकजण फलाटावर धडपडला आणि दैवं बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावला. हे केवळ धावत्या गाडीत चढताना झालं असं नाही तर ‘चटणी’ मुळे तो चढताना पडला, असं सांगण्यात आलं आहे.

विनोद लक्ष्मण चंदनशिवे हे डोंबिवलीचे रहिवासी आहेत. आज सकाळी ते परळ रेल्वे स्थानकाच्या फलाट ३ वर उभे होते. एवढ्यात त्यांना एक जलद लोकल धीमी झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी गाडी पकडण्यासाठी धावण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या मुलांसाठी डोसा आणि चटणी सोबत घेतली होती. ते पाकिट त्यांच्या हातात तसेच होतं. धावत्या गाडीत चढताना त्यातलं चटणीची पिशवी फाटली, त्यातली चटणी पायदानावर सांडली. त्यामुळे विनोद यांचा पाय घसरला आणि ते पडले. इतक्या फलाटवरील रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर ओढत त्यांचा जीव वाचवला.

विनोद यांना थोडी जखम झाली होती. त्यावर दादर स्थानकावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

 

आपली प्रतिक्रिया द्या