शिक्षणमंत्री तावडेंच्या चेहऱ्यावर ‘बुक्का’, जानकर ताब्यात

31

सामना ऑनलाईन । सातारा

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या चेहऱ्यावर अबिर-बुक्का फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारुती जानकर असे या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळते.

धनगर समाजाला आरक्षण, सोलापूर विद्यापीठाचे अहिल्याबाई होळकर नामकरण अशा मागण्यांसाठी धनगर समाजाने आवाज उठवला आहे. या मागण्या मान्य करव्यात यासाठी जानकर याने विनोद तावडे यांच्यावर अबिर-बुक्का फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याने आपल्या मागण्यासाठी घोषणा दिल्या.

मारुती जानकर हा मल्हार क्रांती संघटनेचा सदस्य असल्याचं कळतं. पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या