कोरोना निर्बंधांमध्ये कबाब खायला गेला; पोलिसांनी केला दंड वसूल

ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्टेन आढळल्यानंतर जगभरात चिंता व्यक्त होत आहे. हा नवा स्टेन वेगाने पसरत असून तो अधिक धोकादायक आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आले असून प्रशासन काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करत आहे. कोरोनाच्या नव्या स्टेनचा प्रसार रोखण्यासाठी कठोर निर्देश जारी करण्यात आल्याने खवय्यांची चांगलीच अडचण होत आहे. जीभेचे चोचले पुरवण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका खवय्यांकडून पोलिसांनी मोठा दंड वसूल केला आहे.

ब्रिटनच्या ब्रिस्टलमधील एक नागरिक चेडेर गोर्ग येथील आवडत्या निसर्गरम्य ठिकाणी कबाब खाण्यासाठी गेला होता. निसर्गरम्य वातावरणात कबाबचा आस्वाद घेतल्यानंतर पोलिसांनी त्या वक्तीकडून मोठा रकमेचा दंड वसूल केला आहे. कोरोना निर्देशांमुळे सतर्क असलेले पोलीस पथक गस्त घातल या ठिकाणी आले. या ठिकाणी जास्त कार उभ्या असल्याचे पोलिसांनी दिसले. पोलिसांनी याबाबतची विचारणा केली.

घराबाहेर पडण्यासाठी सबळ कारण नसल्याचे सांगत पोलिसांनी 7 जणांना दंड लावला आहे. हे सातजण स्थानिक नागरिक नाही. तसेच त्यांच्याकडे घरातून बाहेर पडण्यासाठी सबळ कारण नसल्याचे सांगत पोलिसांनी त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. तसेच या व्यक्तीने आपल्याला कबाब खाण्याची इच्छा झाली. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात कबाबचा आस्वाद घेण्यासाठी आपण ब्रिस्टलमधून चेडेर गोर्गला आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

त्याच्या या उत्तराने पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यांनी फक्त खाण्यासाठी आणि जीभेचे चोचले पुरवण्यासाठी कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे सांगत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे. तसेच त्याला कोरोनाच्या नव्या स्टेनचा धोका आणि निर्देशांची माहितीही दिली.

आपल्याला प्रवास करायचा असेल तर जवळच्या परिसरातच गाव आणि शहरातच प्रवास करा, असे आवाहन सोमरसेट पोलिसांनी केले आहे. तसेच घराबाहेर पडण्याची आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने निर्बंध जारी केले असले काही नियम पाळत व्यायाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी घरापासून जास्त दूर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

ब्रिटनमध्ये नवा स्टेन आढळल्यानंतर निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात व्यायाम करण्यासाठी घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर गेलेल्या दोन जणांवर 200 पाऊंडचा दंड लावण्यात आला होता. ते दोघे वेगवेगेळ्या गाडीत होते. तसेच त्यांनी कोरोना नियमांचे पालनही केले होते. मात्र, घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर का आले असा सवाल करत पोलिसांनी त्यांच्याकडून दंड वसूल केला.

सबळ कारण असल्याशिवाय घराबाहेर पडण्यास ब्रिटनमध्ये मनाई करण्यात आली आहे. कामासाठी आणि शिक्षणासंबंधित कामासाठी घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 2020 या वर्षात सुमारे 6 लाख 8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर युकेमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 100 वर्षात महामारीमुळे होणाऱ्या मृत्यूचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या