चित्रपटाने बुडवले.. बायकोने छळले.. उद्ध्वस्त चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

83

ब्रिजमोहन पाटील,पुणे

चित्रपट निर्मितीत झालेलं नुकसान आणि पत्नीच्या छळाला कंटाळून एका मराठी चित्रपट निर्मात्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक छळ यांचा ताण सहन न झाल्याने या निर्मात्याने आत्महत्या केली. अतुल तापकीर असं या निर्मात्याचं नाव असून २०१५ मध्ये आलेल्या ढोलताशे या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. पण, दुर्दैवाने तो चित्रपट चालला नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेले तापकीर निराशेत होते. त्या निराशेच्या भरात त्यांनी प्रभात रोड येथील प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये आत्महत्या केली.

president-hotel-pune

आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुक अकाऊंटवर त्यांनी आपल्या आत्महत्येचं कारण एका पोस्टद्वारे शेअर केलं. या पोस्टनुसार त्यांना चित्रपट निर्मितीत आर्थिक नुकसान झालं होतं. त्यातूनही ते हळूहळू सावरत असताना त्यांच्या पत्नीने त्यांना छळायला सुरुवात केली होती. पैशांची मागणी, शारीरिक, मानसिक छळ होत असून आपल्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली गेली. इतकंच नव्हे तर पत्नी आपल्या वडिलांना आणि बहिणींना शिवीगाळ करत असून तिच्या या छळाचा फटका मुलांनाही पडला असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या सगळ्यांमुळे समाजात होत असलेली बदनामी सहन न होऊन हा आत्महत्येचा मार्ग निवडल्याचं तापकीर यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या