१०० कोटींवर पाणी सोडून तो होणार भिक्षू

15

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

जैन धर्माची दीक्षा घेण्यासाठी कोल्हापुरातील एक तरुण वडिलांच्या १०० कोटींच्या व्यापारावर पाणी सोडणार आहे. मोक्षेष शहा असं या २४ वर्षांच्या तरुणाचं नाव असून १९ एप्रिल रोजी त्याला दीक्षा दिली जाणार आहे.

कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या मोक्षेषचं कुटुंब मूळचं गुजरातमधलं. सनदी लेखापाल (सीए)चं शिक्षण घेतलेल्या मोक्षेषने २ वर्षं आपल्या वडिलांच्या व्यवसायात काम केलं. वडिलांच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या घरात आहे. दोन वर्षं व्यवसाय सांभाळताना त्याला पैसा हेच आयुष्याचं लक्ष्य नसल्याचं त्याला वाटलं. भरीस भर म्हणून मोक्षेष दोन वेळा मृत्यूच्या दाढेतून वाचला आहे. २०११ मध्ये झवेरीबाजारात झालेल्या बॉम्बस्फोटातून आणि नंतर एकदा पुणे-मुंबई महामार्गावर एका अपघातात तो सुदैवाने बचावला.

या दोन्ही घटनांचा त्याच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचं मोक्षेषचं म्हणणं आहे. पैसा कमवून अकाउंटची बॅलन्सशीट भरण्यापेक्षा भिक्षू होऊन पुण्याची बॅलन्सशीट भरण्यासाठी आता मी उत्सुक आहे. माझ्या आईवडिलांचाही माझ्या या निर्णयाला पाठिंबा आहे, असं मनोगत मोक्षेषने व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या