
अमेरिकेतील अरिझोना इथे राहणाऱ्या एका महिलेने टीकटॉकवर तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे कारनामे सांगितले आहेत. ‘हेली’ असं या महिलेचं नाव असून तिचा पूर्वाश्रमीचा नवरा हा अत्यंत रंगेल स्वभावाचा होता. त्याच्या कारनाम्यांमुळे या महिलेने शहर सोडून इतरत्र स्थायिक व्हायचा निर्णय घेतला आहे.
हेलीच्या नवऱ्याचे काही महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. त्यातून त्याला 9 मुलं झाली आहेत. हेच हेलीच्या चिंतेचे कारण बनले आहे. हेलीला चिंता सतावतेय की ही सावत्र भावंडं एकमेकांच्या प्रेमात पडली तर काय होईल? चुकून-माकून आपली मुलं सावत्र भावंडांच्या प्रेमात पडून ती डेटवर जाऊ नयेत यासाठी हेलीने शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हेलीने म्हटलंय की तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याच्या एका मुलीची प्रसुती होत असताना ती स्वत: हॉस्पीटलमध्ये होती, कारण या मुलीची आई हेलीची खास मैत्रीण होती. या मुलीच्या प्रसुतीनंतर 3 दिवसांनी हेलीला कळालं की ही मुलगी तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याचीच आहे. आपली खास मैत्रिणीचे पूर्वाश्रमीच्या नवऱ्यासोबतचे संबंध कळाल्यानंतर हेलीला धक्का बसला होता. हेलीने शहर सोडण्यामागचं कारण सांगणारा व्हिडीओ टीकटॉकवर अपलोड करताच तो लाखों लोकांनी पाहिला आहे.