नऊ वर्षीय हिंदुस्थानी मुलीने तयार केले ऍप! अॅपलच्या सीईओंकडून कौतुकाची थाप

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नऊवर्षीय हिंदुस्थानी मुलीचे कौतुक केले आहे. एवढय़ा कमी वयात ही मुलगी आयओएस अॅप डेव्हलपर म्हणून काम करतेय. दुबईत राहणाऱया या हिंदुस्थानी वंशाच्या मुलीचे नाव हाना मोहम्मद रफीक आहे. तिने टिम कुक यांना ई-मेल पाठवून आपली स्टोरीटेलिंग अॅप ‘हानास’विषयी सांगितले. हे अॅप तिने स्वतः तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने पालक आपल्या मुलांसाठी कथा रेकॉर्ड करू शकतात. हाना हिने ई-मेल पाठवून अॅपलच्या सीईओंना अॅपचा प्रिह्यू करण्याची विनंती केली होती. या ई-मेलला उत्तर देताना कुक यांनी तिचे कौतुक केले आहे.

लहानपणापासून कोडिंगची आवड 

अॅप बनविण्यासाठी तिने कोडच्या जवळपास 10 हजार लाइन्स लिहिल्या होत्या. हाना वयाच्या पाचव्या वर्षांपासून कोडिंग करतेय. तिने अॅपसाठी कोणत्याही प्री-मेड थर्ड पार्टी लाइब्रेरीज, क्लासेज किंवा कोड्सची मदत घेतली नाही. ती आपल्या पालकांच्या मदतीने कोडिंग शिकली आहे.