26/11 मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणी हाफिज सईदला 5 वर्षांची शिक्षा

722
hafiz-saeed

मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी (टेरर फंडिग केस) लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावील आहे. या प्रकरणी 11 डिसेंबर 2019 रोजी हाफिज सईद याला दोषी ठरवण्यात आले होते.

पाकिस्तानातल्या पंजाब पोलिसांनी 17 जुलैला हाफिज सईद व त्याचा मलिक झफर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पंजाबमधील तब्बल 23 ठिकाणी हाफिज विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हाफिज सईदला अटक देखील झाली होती. सध्या हाफिज कोट लखपत तुरुंगात कैद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या