कॉर्नेटो आईसक्रीमची बनावट वेष्टने तयार करणाऱ्या कंपनीला दोन लाखांचा दंड

8

सामना प्रतिनिधी । मुंबई 

प्रसिद्ध कॉर्नेटो आईसक्रीमच्या नावात फेरफार करत हुबेहूब वेष्टन तयार करून बाजारात त्याची विक्री करणाऱया एका कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. आईसक्रीमचे वेष्टन, बॅनर्स, पॅकिंग लेबल्स आणि होर्डिंग नष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाने संबंधित कंपनीला दिले असून दोन लाख रुपयाचा दंडही ठोठावला आहे तसेच हे पैसे आठवडाभरात याचिकाकर्त्यांना द्या असेही न्यायमूर्तींनी बजावले आहे.

कॉर्नेटो आईसक्रीमच्या नावातील सी या अद्याक्षराऐवजी के हे आद्याक्षर वापरून हुबेहूब वेष्टन तयार करत बाजारात एक कंपनी आईसक्रीम विक्री करत असल्याचा प्रकार कॉर्नेटो आईसक्रीम बनविणाऱया  युनिलिव्हर पीएलसी या कंपनीच्या लक्षात आले. ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी युनिलिव्हर कंपनीने हायकोर्टात धाव घेत याप्रकरणी याचिका दाखल केली. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या