मुलामुलींसाठी लग्नाचं किमान वय वेगळं का? न्यायालयात याचिका

857

हिंदुस्थानात मुला-मुलींचे लग्नाचे किमान वय हे निश्चित करण्यात आले असून मुलांसाठी 21 वर्ष तर मुलींसाठी 18 वर्ष वयाची अट ठेवण्यात आली आहे. मात्र मुलामुलींसाठी निश्चित करण्यात आलेल्या किमान वयात भेद असून लैंगिक समानतेच्या विरोधी आहे, असे म्हणत एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

मुलामुलींसाठी लग्नाचे किमान वय वेगवेगळे निश्चित करणे हे लैंगिक समानता (Gender Equality) , जेंडर जस्टीस (Gender Justice) आणि आत्मसन्मानाच्या विरोधात जाते, असे या याचिकेत म्हणण्यात आले आहे.