
कोणाचे नशीब कधी उजळेल सांगता येत नाही. अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तिच्या बाबतीतही हाच अनुभव आला आहे. एका छोट्याशा चिनीमातीच्या बाऊलमुळे तिचे भाग्य फळफळले आहे.
अमेरिकेतील कनेक्टिकट शहरात राहणाऱ्या एका व्यक्तिने त्याच्या घराच्या परिसरात असलेल्या प्रदर्शनातून 35 डॉलर म्हणजे 2550 रुपये किमतीला चिनी मातीचे एक बाऊल विकत घेतले होते. चिनी मातीपासून बनवण्यात आलेले दुर्मिळ बाऊल म्हणजे चीनच्या कलाकृतीचा एक उत्तम नमुना आहे. पांढऱ्या रंगाच्या बाऊलला आतून निळ्या रंगाच्या फुलांचे डिझाईन आहे.
14व्या शतकातली ही पुरातन कलाकृती असून अत्यंत दुर्मिळ आहे. पुरातन कलाकृतींची आवड असणाऱ्या एका व्यक्तीने ही कलाकृती गेल्या वर्षी न्यू हेवन परिसरातील एका प्रदर्शनात पाहिली. त्याला हे अनोखे बाऊल अत्यंत आवडले. विशेष म्हणजे अशा प्रकारचे फक्त सातच बाऊल बनवण्यात आले होते.
17 मार्च रोजी न्यूयॉर्कमधील चिनी कला महोत्सवात या बाऊलचा लिलाव होणार आहे. लिलावात या बाऊलला 3 ते 5 लाख डॉलर किंमत मिळाली आहे.
सोथेबी या वस्तुसंग्रहालयाचे अध्यक्ष मैकअटीर यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही हे बाऊल पाहिले तेव्हा त्याचे पेंटिंग, आकार त्याचा निळा रंग पाहून तो 15व्या शतकातील चिनी मातीपासून बनवला गेला आहे, अशी माहिती मिळाली होती. तेव्हा प्रत्यक्ष जाऊन ते बाऊल पाहिले तेव्हा लक्षात आले की, इसवी सन 1400 शतकात बनवल्याचे लक्षात आले. या दुर्मिळ बाऊलला कोट्यवधींची किंमत मिळाली आहे.