इथं बनतो मास्क पराठा, वाचा काय आहे कारण

546

एखादी गोष्ट अधिक चर्चेत आली की त्याची छाप अन्न पदार्थ किंवा त्यांच्या नावांमध्ये दिसू लागते. कोरोना देखील त्याला अपवाद नाही. कोरोनाच्या जीव रक्षक बनलेला फेस मास्क हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या मास्कच्या आकाराचा पराठा एका हॉटेलमध्ये बनत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.

वर्ल्ड कप फिवर असला की बॉल, बॅट, स्टंप, अशा आकारात पदार्थ मिळतात. तसंच या कोरोनाच्या काळात जीव रक्षक बनलेला मास्क आता पराठ्याच्या रुपात पाहायला मिळतो आहे. तामिळनाडू मधील मदुराई येथे एका हॉटेलमध्ये मास्क पराठा तयार केला जात आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क महत्त्वाचे आहे. तरी देखील अनेक जण मास्क न वापरता बाहेर पडतात. अशा वेळी समाजात जागरूकता वाढावी या हेतूने पराठा मास्कच्या आकारात तयार करण्यात येत असल्याचे, मॅनेजर पुवालिंगम यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या