चंद्रपूर – वाघिणीसह बछड्याचा मृतदेह आढळल्याने वन विभागात खळबळ

मध्य चंदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या सुकवाशी डोंगरगाव जंगलात वाघीण आणि बछडाचे कुजलेल्या अवस्थेत शव आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वन विभागात खळबळ उडाली. वाघिणीच्या इतर बछड्यांचा शोध वन विभाग घेत आहे. ही घटना सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक 163 व 161मध्ये घडली.

एका बछडाच्या मृतदेह 161 मध्ये आढळून आला होता. त्यानंतर वन विभागाणे आज शोध मोहीम घेतली असता कक्ष क्रमांक 163 मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाघांना अग्नी दिला.

वाघ आणि बछड्याचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या वाघिणीला किती बछडे आहेत याची माहिती वन अधिकाऱ्यांकडे नाहीये. शोध मोहीम सुरू आहे. वाघीण बछड्या सह या परिसरात आहे हे वन अधिकाऱ्यांना माहीत होते का? असा प्रश्न यावेळी उपस्थित केला जातोय.