जी 7 गटाच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल झाले आहेत. ते अनावरण करणार असलेल्या महात्मा गांधींच्या येथील पुतळ्याची खलिस्तानवादी आंदोलकांनी तोडफोड केल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मोदी एका खास विमानातून इटलीत आले असून त्यांची निवास व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये एसपीजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
पंतप्रधानांचे बोइंग 777-300 ईआर विमान जॅमर यंत्रणा आणि स्वयंचलित क्षेपणास्त्र लाँचरने सुसज्ज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष वापरत असलेल्या बोईंग 747 आणि या विमानामध्ये बहुतेक सुरक्षाविषयक सुविधा आणि इतर सोयीसुविधा सारख्याच आहेत. भारताने अशी तीन विमाने खरेदी केली असून त्यापैकी दोन व्हीव्हीआयपींसाठी आहेत.
बोईंग 777-300 ER मध्ये सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. नवीन विमानात इलेक्ट्रॉनिक धोक्यांपासून संरक्षण देणारी यंत्रणा आहे.