लैंगिक शोषण आरोप : अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांकडून समन्स

anurag-kashyap-ani

दिग्दर्शक अनुराग कश्यप याला वर्सोवा पोलिसांनी चौकशीकरिता हजर राहण्यासाठी म्हणून समन्स धाडले आहेत. आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने ट्विटरद्वारे केला होता. यासंदर्भात तक्रार देखील नोंदवण्यात आली होती. अखेर वर्सोवा पोलिसांनी 1 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. तसेच या ट्विटमुळे आपल्या जिवाला धोका असून आपली मदत करण्याची विनंती तिने पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती.

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. काही वर्षांपूर्वी मी अनुराग यांना कामानिमित्त भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी एका रुममध्ये नेऊन त्यांनी माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पायलने केला आहे. तसेच या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, जेणेकरून त्याचे खरे रूप जगासमोर येईल’, असेही तिने म्हटले आहे. दरम्यान, पायलने केलेले सर्व आरोप अनुराग यांनी धुडकावले होते.‘थोडी तरी मर्यादा बाळगा’ असे तो म्हणाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या