कारची बाईकला धडक; एक ठार, दोन गंभीर

सामना ऑनलाईन । चाळीसगाव

चाळीसगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.

नेहमी प्रमाणे कामावर निघालेल्या रमाकांत गुंजाळ यांच्या बाईकला महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने जोरदार धडक दिली. यामध्ये रमाकांत गुंजाळ यांचा मृत्यू झाल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीवरून देण्यात आली. तर अन्य दोन दण गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या