
शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्यामुळे संतापलेल्या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या शाळेच्या वसतिगृहालाच आग लावली. या आगीत तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना दक्षिण अमेरिकेतील गयाना देशातील राजधानीपासून 200 मैलावर असलेल्या सेंट्रल गयाना मायनिंग टाऊनमध्ये घडलेली असून, सोमवारी रात्री महदिया माध्यमिक शाळेच्या मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. पाहता पाहता आग वाढत गेली. शाळेचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अनेक विद्यार्थिनी आणि कर्मचारी आगीमुळे आत अडकले. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. आग विजेपर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनीने ही आग लावल्याचे उघडकीस आले. तिने आग लावण्याची धमकीही दिलेली होती. विशेष म्हणजे आग लावत असताना विद्यार्थिनीदेखील जखमी झाली. या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक करण्यात आली असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेराल्ड गोविया यांनी दिली. आरोपी विद्यार्थिनीवर सध्या उपचार सुरू आहेत.