वाघ गुजरातला जाणार, बदल्यात सिंह येणार; वनमंत्र्यांनी दिली माहिती

tiger

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाघ गुजरातला पाठवण्यात येणार असून बदल्यात गुजरातमधून सिंह आणणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये यासंदर्भात करार झाला आहे. लवकरच केंद्राकडूनही त्यास मंजूरी घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी गुजरातच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी भेट घेतली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर वाघ आणि सिंहाच्या करारासंदर्भात त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिता हा देशात आणला. आता बोरिवलीतून वाघ गुजरातमध्ये पाठवण्यात येणार आहे, तर बदल्यात गुजरातमधील सिंह महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे,

बोरिवलीच्या वाघासंदर्भातील प्रस्तावाबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव ) सुनील लिमये व जुनागढ सक्करबाग उद्यानाचे संचालक अभिषेक कुमार यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 एप्रिल 20202 रोजी अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉ. क्लेमन्ट बेन आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीचे संचालक जी. मल्लिकर्जुन यांनी सुनील लिमये यांच्या निर्देशानुसार गुजरातचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली व कार्यवाही सुरू केली होती.