मलायकाने सोडल्याने अरबाज झालाय ‘खुला सांड’, ट्रोलर्सने टोलवला

51

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मलायका अरोरा हिच्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह अरबाज ‘पिंच’ ही वेबसिरीज प्रदर्शित करणार आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये अरबाज खान ट्रोलर्सला उत्तर देताना दिसत आहे.

मलायका आणि अर्जुन कपूर एप्रिलमध्ये करणार लग्न?

‘पिंच’ या शोचा एक एपिसोड प्रदर्शित झाला असून यात अभिनेत्री करीना कपूर-खान सहभागी झाली होती. यादरम्यान करीनाने ट्रोलर्सच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. याच दरम्यान अरबाजबाबतही अनेकांनी काही प्रश्न कमेंट केले. घटस्फोटानंतर अरबाज खान आता ‘खुला सांड’ झाल्याची कमेंट एका युझर्सने केली. ही कमेंट वाचल्यानंतर करीना हसू आवरले नाही.

ट्रोलर्सची कमेंट वाचल्यानंतर अरबाज म्हणाला की, ’21 वर्षापासूनचे संबंध संपुष्टात आले आहेत. यात काही तथ्यही आहेत, त्यामुळे याचे मला वाईट वाटत नाही. एक वेळ अशी आली होती की असे करावे लागले आणि सर्व सोडून पुढे निघावे लागले.’

अरबाजसोबत वाजल्यानंतर मलायका पहिल्यांदा बोलली, म्हणाली आमच्यामुळे …

बँक खात्यात खडखडाट
दरम्यान, अरबाज खान याच्या अकाऊंटमध्ये एकही पैसा नसल्याचेही समोर आले आहे. ठाणे पोलिसांनी अरबाज खान याचे बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर चौकशी थांबली आणि त्याला 100 रुपये देत बँकेत मिनिमम बॅलन्स ठेवण्यास सांगितले असे ट्वीट एका युझरने केले. यावर उत्तर देताना अरबाज म्हणतो की, हे खरं असून माध्या अकाऊंटमध्ये एकही पैसा नाही. परंतु करीनाना मात्र यावर विश्वास ठेवला नाही आणि दोन सुपरहिट चित्रपट बनवल्याने असं होऊ शकत नाही, असं करीना म्हणाली.

हो, आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत
याआधी अरबाज खान याने गर्लफ्रेंड जॉर्जिया अँट्रियानासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबुल केले होते. जॉर्जियाच आता आपली लाईफ असल्याचेही अरबाज म्हणाला. तसेच लग्न करणार का या प्रश्नावर अरबाज म्हणाला की, हे रिलेशन कुठपर्यंत जातं हे येणारा काळच ठरवेल.

arbaaz-khan-girlfriend-gior

आपली प्रतिक्रिया द्या