सुखावर बलात्कार करणाऱ्या प्रियकराची हत्या झाली, प्रेयसीच्या चौकशीतून उघड झाले धक्कादायक सत्य

ब्रिटनच्या ब्रिस्टल काऊंटी कोर्ट भागात राहणाऱ्या हेली किटींग (31 वर्षे) हिच्यावर तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिचा प्रियकर मॅथ्यू याच्या शरीरावर एक खोल जखम दिसून आली असून त्याला भोसकल्याने ही जखम झाल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी 14 मे रोजी हेलीवर आरोप करण्यात आला होता. त्यावेळी हेलीने या आरोपांचा इन्कार केला होता. गंभीर जखमी झालेला मॅथ्यू तडफडत असताना कोणीतरी पोलिसांना फोन केला होता. तो मरतोय असं फोन करणारी महिला पोलिसांना ओरडून सांगत होती.

पोलिसांना फोन करणारी महिला ही हेलीच होती. हेली तेव्हा प्रचंड घाबरलेली होती. तिने पोलिसांना सांगितलं की, ‘तो मरतोय, मी संतापली होती म्हणून मी त्याला चाकू फेकून मारला आणि आता तो मरतोय, इते लवकर या प्लीज.’ हेलीविरूद्धच्या खटल्यादरम्यान कोर्टामध्ये हे संभाषण ऐकवण्यात आलं होतं. पोलीस आणि वैद्यकीय मदत तिथे पोहोचली तेव्हा मॅथ्यूचा श्वास थांबला होता. त्याला अटॅक आला होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. हेलीने मॅथ्यूला का भोसकलं याचा उलगडा सोमवारी म्हणजेच 11 जुलै 2022 रोजी झाला.

हेलीने सांगितलं की मॅथ्यू कामातूर झाल्यानंतर प्रणयादरम्यान तो माझा गळा आवळायचा. कधी तो हाताने गळा आवळायचा तर कधी पट्ट्याने. गळा आवळल्याने मी बेशुद्ध पडायचे. सुरुवातीला मी काहीच बोलले नाही, मात्र एकेदिवशी मी त्याला सांगितलं की हे सगळं माझ्यावर बलात्कार होत असल्यासारखं वाटायला लागलं आहे. यानंतर मॅथ्यू तिला सोडून काही दिवसांसाठी निघून गेला होता. तो परत आल्यानंतर जेव्हा तो हेलीला भेटला त्यानंतर त्याने तिच्यासोबत पुन्हा तसंच केलं होतं. यामुळे संतापल्याने हेलीने त्याला भोसकलं होतं. खासगी क्षण ही आनंददायी असावेत असं महिलेला वाटत असतं. मात्र मॅथ्यू या सुखाच्या क्षणी हैवानासारखा वागून हेलीला त्रास देत होता, आणि यामुळे ती संतापली होती.