मरीन ड्राइव्हवर भरधाव कारच्या धडकेत कॉलेज तरुणीचा मृत्यू

30

सामना ऑनलाईन । मुंबई

नायर दंत विद्यालयातील डॉक्टर दीपाली लहामटे हिचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मरीन ड्राइव्हवर आणखी एक हिट ऍण्ड रन घडले. सोमवारी सायंकाळी भरधाव कारने सायली रजपूत (१७) या कॉलेज तरुणीला जोरदार धडक दिली. या अपघातात सायलीचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळालेल्या कारचालकाचा मरीन ड्राइव्ह पोलीस शोध घेत आहेत.

मालाड येथे राहणारी सायली आपल्या मैत्रिणींसोबत मरीन ड्रइव्ह येथे फिरण्यासाठी आली होती. सायंकाळी चारच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने सायलीला उडविले. पोलीस आणि इतर नागरिकांच्या मदतीने मैत्रिणींनी तिला नायर रुग्णालयात उपचारासाठी नेले, पण दाखल करण्यापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याच ठिकाणी २४ मार्च रोजी डॉ. दीपाली लहामटे हिला शिखा झव्हेरी या महिला कारचालकाने उडविले होते. यात दीपाली हिचा मृत्यू झाला. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या