आधार कार्ड मोफत अपडेटची मुदत 14 सप्टेंबरपर्यंत वाढवली

आधार कार्ड हे प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचे ओळखपत्र आहे. अनेक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड आवश्यक असते.  जर तुमचे आधार कार्ड काढून 10 वर्षे झाली असतील आणि कधीच अपडेट झालेले नसेल तर ते मोफत अपडेट करता येते. आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत आता 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ‘मायआधार’ पोर्टलवर जावे लागेल. तिथे काही माहिती बदलता येते. पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक ही माहिती अपडेट करू शकता. परंतु काही माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार पेंद्रावर जावे लागेल. उदाहरणार्थ, बायोमेट्रिक किंवा पह्टो अपडेट करण्यासाठी आधार पेंद्रावर जावे लागेल.

काय कराल?

n तुम्हाला यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

n आधार अपडेटचा पर्याय निवडा

n मोबईल नंबर टाकल्यावर ओटीपी येईल.

n कागदपत्रे अपडेटचा पर्याय निवडा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपडेट करा.

n यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल. काही दिवसांनंतर तुम्हाला तुमचे अपडेटेड आधार कार्ड
ऑनलाइन पाहायला मिळेल.