आधार कार्ड लिंक करण्याच्या मुदतीत वाढ

23

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या वाढलेल्या मुदतीनुसार नागरिक ३१ मार्च २०१८ पर्यत आधार कार्ड लिंक करु शकतील. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी ही माहिती दिली आहे.

सरकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने आधार कार्डची लिंक जोडणे सक्तीचे केले आहे. यानुसार ३१ डिसेंबर २०१७ पर्यत आधार लिंक करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. पण देशातील अनेकजणांनी अद्यापपर्यत आधार कार्डच काढलेली नाहीत. यामुळे अनेकजण सरकारी योजनांपासून वंचित राहीले आहेत. सरकारच्या या आधारसक्तीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल अनेकजणांनी तक्रारी केल्याचे वृत्त आहे. आधारसक्ती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आधार सक्ती बेकायदा असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

बुधवारी याप्रकरणी न्यायालयाला आधारसक्तीचे स्पष्टीकरण देताना महाधिवक्त्यांनी आधार कार्डची लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या