आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही, सत्र न्यायालयाचा निर्वाळा

185
supreme_court_295

हिंदुस्थानात 15 वर्षे बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱया एका बांगलादेशी महिलेला मुंबईच्या सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला. आधारकार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही असे स्पष्ट करत हिंदुस्थानात घुसखोरी केल्या प्रकरणी न्यायमूर्तींनी सदर महिलेला दोषी ठरवले. एवढेच नव्हे तर तिला एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावली.ज्योती गाझी उर्फ तस्लिमा रबिऊल असं त्या महिलेचे नाव आहे. रबिउल दहिसर पूर्वेला राहत असून 15 वर्षा पूर्वी ती बांगलादेश येथून मुंबईत आली होती. 2008 साली पोलिसांनी रावळ पाडा येथे छापा टाकत सहा पुरुष, चार बायका आणि एका लहान मुलाला ताब्यात घेतले होते चौकशी केली असता बांगलादेशचे हे नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.

आपली प्रतिक्रिया द्या