आता कंपन्यांनाही बनवावं लागणार आधार कार्ड

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील जनतेला आधार कार्ड सक्तीचे केले असताना आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी औद्योगिक कंपन्यांनाही आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे आता उद्योजकांना स्वत:सोबत त्यांच्या कंपन्याचे देखील आधार कार्ड काढावे लागणार आहे.

” सरकार आता प्रत्येक व्यवसायाला, कंपनीला एका युनीक आईडी देणार आहे. आधार कार्डासारखीच ही योजना असणार आहे. यामुळे कंपन्यामधून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आणि अनुदानाच्या गैरवापराला आळा बसणार आहे. तसेच यामुळे बोगस कंपन्या तयार करून भ्रष्टाचार करणाऱ्यांनी आळा बसेल” असे जेटली यांनी जाहीर केले.

गेल्या काही वर्षांपासून बोगस कंपन्या स्थापन करुन आर्थिक गैरव्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षात सरकारने तीन लाखाहून अधिक बोगस कंपन्यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने अशा कंपन्यांना रोखण्यासाठी आधार कार्डाची योजना लागू केल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या