आदित्य ठाकरे यांनी केले एफसीव्ही फुटबॉल अकादमीचे उद्घाटन

49

सामना ऑनलाईन | मुंबई

मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांताक्रुझ (प.) येथील एफसीव्ही इंटरनॅशनल फुटबॉल अकादमीचे उद्घाटन चेंडूला किक मारून केले. याप्रसंगी इंग्लंडची हिंदुस्थानातील उपउच्चायुक्त हेडन स्पायसर, ‘विफा’चे ‘सीईओ’ हेन्री मेनेझिस, माजी कसोटीपटू प्रवीण अमरे, अकादमीचे संस्थापक व लायन्स इंटरनॅशनलचे अमित देसाई, एमडीएफएचे सदस्य नगरसेवक अमेय घोले हे मान्यवर उपस्थित होते.

लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एफसीव्ही अकादमीत नामवंत देशी प्रशिक्षकांसोबत विदेशी फुटबॉल प्रशिक्षकही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार आहेत. मिलन सबवेनजीकच्या लायन्स स्पोर्टस् संकुलात ही अकादमी सुरू राहणार आहे. या अकादमीमुळे मुंबईत आगामी काळात अव्वल दर्जाचे फुटबॉलपटू तयार होतील.

आपली प्रतिक्रिया द्या