नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज येवला आणि मनमाडमध्ये जाहीर सभा झाल्या. नाशिक दौऱ्यावर असताना आज आदित्य ठाकरे यांचे निफाडमध्ये ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. येवल्यामध्ये ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ झाली. या सभेत 24 ऑगस्टला म्हणजे शनिवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी होण्याची आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.