महापालिकेतील रस्ते घोटाळय़ाची लोकायुक्तांकडून चौकशी करा!

मुंबईतील रस्ते घोटाळ्य़ाची लोकायुक्तांकडून चौकशी करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. शिष्टमंडळात शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिवखासदार अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, उपनेते सचिन अहिर, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, सुनिल शिंदे, अजय चौधरी, विलास पोतनीस, संजय पोतनीस, राजन साळवी, ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर यांचा समावेश होता.