”महाराष्ट्रात गद्दारी झाल्यानंतर खोके घेतलेल्यांपैकी कुणी वाईनची दुकानं टाकली, कुणी 72 व्या मजल्यावर घरं घेतली, कुणी डिफेंडर गाडी घेतली. पण इथल्या एकाही तरुणासाठी नवीन रोजगार महाराष्ट्रात आलेला नाही. गेल्या दोन वर्षात फक्त गद्दारांची प्रगती झाली आहे, महाराष्ट्राची झालेली नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पैठण येथील सभेत केला.
”लोकसभेत या मतदारसंघात आपला पराभव झाला असला तरी देशात वातावरण आपण जिंकल्यासारखं आहे. ज्या हुकुमशहांना वाटत होतं की ते चारशे पार जातील, एक्झिट पोल सांगत होते की चारशे पार जाणार त्यांना आपण 240 वर अडकवले आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशने दाखवलंय की इथे माज, हुकुमशाही, मस्ती चालत नाही. इथे फक्त जनतेचा आावाज चालतो’, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
”मला आठवतं. दोन वर्षापूर्वी नुकतीच गद्दारी झालेली त्यानंतर मी निष्टा यात्रा काढलेली. कार्यक्रमाचे नियोजन नसताना आम्ही महाराष्ट्रात फिरलेलो. उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं की लोकांचे आशीर्वाद घे. त्यासाठी निष्ठा यात्रा सुरू केली.त्यावेळी पैठण मध्ये येत असताना पैठणच्या दारावर एक छोटीशी रॅली घेणार असं सांगितलेलं. गद्दारी झालेली असल्याने मला वाटलेलं पाच दहा पन्नास माणसं असतील. मात्र त्यावेळी दहा मिनिटांच्या अतंराला तासभर लागला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वाटलं की मला जोशची गरज आहे. तेव्हा मी पैठणला येतो. आज मी पैठणकरांसमोर नतमस्तक होत आहे”
”आपला आवाज ससंदेत पोहोचला आहे. आपली लढई संपलेली नाही. त्यांचं बहुमताचं सरकार रोखलेलं आहे. येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं आहे. त्यापेक्षा मोठी लढाई महाराष्ट्रात होणार आहे. हे युद्ध नाही निवडणूक आहे. युद्धासारखे लढू नका. वार करू नका. आपल्याला दंगली घडनवायच्या नाहीत पण पुढच्या पन्नास वर्षातील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक ठरणार आहे. देशात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र केंद्रात भाजपचं सरकार बसलेलं आहे. निवडणूक आयोगाने हरियाणा, जम्मू कश्मीरची निवडणूक लागलेली आहे. मात्र आपली निवडणूक जाहीर झालेली नाही. कारण ते आपल्याला घाबरलेले आहेत. ते जनतेला घाबरलेले आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने जो निकाल दिलाय त्याला घाबरले आहेत. कारण त्यांना समजले आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे तो दिल्ली समोर झुकणार नाही. तुमच्या,कडे कितीही धन असेल तरी हा बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा महाराष्ट्र आहे. तो तुमच्यासमोर झुकणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
”गद्दारांची प्रगती बघितली का? कुणी वाईनची दुकानं टाकतायत. कुणी 72 व्या मजल्यावर घर घेतंय. कुणी डिफेंडर गाडी घेतंय. अशी यांची प्रगती सुरू आहे. दोन वर्षात गद्दारांची प्रगती झाली पण महाराष्ट्राची झालेली नाही. आज आपल्या महाराष्ट्राचे जे आपले हाल होत आहेत. ती परिस्थिती अजून बिकट होत चालली आहे. आता आपण पाहतोय की आंदोलनं चिघळायला लागली आहे. सरकारकडून कुणी संवाद साधायला येत नाहीए. कारण यांच्या मनात काहीतरी काळं आहे. यांची डाळच पूर्ण काळी आहे. म्हणूनच मी म्हणतोय की ही तुमच्या जीवनातील सर्वात मोठी निवडणूक आहे. सगळीकडे अंधकार आहे. या अंधकारात मशाला पेटावयाची की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आपल्याला बदला नाही घ्यायचा पण बदल घडवायचा आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
”जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे मोर्चे निघाले तेव्हा मोदींच्या भाजपने शेतकऱ्यांनी दहशतवादी नक्षलवादी, माओवादी, अर्बन नक्षलवादी म्हणतात. एवढ्यावर थांबत नाही. ्तयांच्यावलर लाठीचार्ज करायला लावतात. आज शेतकऱ्याने भाजपला त्यांची जागा दाखवली आङे. ही निवडणूक फार महत्त्वाची ठरणार आहे. मी आज शेतकरी बांधवांन विचारणार आहे. अवकाळी पाऊस झाला, सततचा पाऊस आला. गारपीट झाली, त्यावेळी मी आणि अंबादास जी दिसलो की कृषी मंत्री दिसले. तुमचे प्रश्न उठवताना दिसले. पंचनामे करून घेतले आणि सरकार दरबारी पाठवले. पण हे शासन इतकं निर्दयी खोटं आहे की कधीच त्यांनी जेवढी गरज तेवढी मदत केली नाही. जेव्हा आपलं सरकार बसलं होतं. उद्धव ठाकरे यांनी पहिली मदत शेतकऱ्यांना केली. कर्जमुक्त केली होती. दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली होती. उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्ती केली तेव्हा निवडणूका नव्हत्या. पाच वर्ष होती निवडणूकीला, पण उद्धव ठाकरेंनी निवडणूक नाही डोळ्यासमोर ठेवली. शेतकरी बांधव डोळ्यासमोर ठेवला व कर्जमुक्ती करून दाखवली. उद्धव ठाकरे जंस तुम्हाला कुटुंबप्रमुख वाटले तसं आज या सरकारमध्ये कुणीतरी आपलं वाटतं का. कृषी मंत्र्याला दोन वर्षात पाहिलं आहे का या सरकारडून कोण धीर द्यायला आलं आहे का? जे चाळीस गद्दार उद्धव ठाकरे यांचे होऊ नहाी शकले ते तुमचे काय होणार”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले