ढोंगी सरकारला जाब विचारण्याची वेळ आलीय – आदित्य ठाकरे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे शनिवारी नाशिक जिल्ह्यात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधायला आले होते. नाशिक जिह्यातील निफाड तालुक्यातील भेंडाळी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी ”माझ्या बळीराजाचं हे दुःख बोलून मोकळं होण्याइतकं सोपं नाही. या संकटकाळात बळीराजाला मजबूत पाठबळ हवंय आणि आम्ही ते देणार” असा शब्द युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आदित्य ठाकरे यांनी निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील व सिन्नर तालुक्यातील वडागंळी गावातील कांदा टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. ‘पीक बियाणे, खतांवरचा भाव वाढला पण शेतीमालाला भाव नाही. घटनाबाह्य सरकारच्या कार्यक्रमांवर करोडो रुपयांचा खर्च होतोय पण अन्नदात्याच्या पिकाला कवडीमोलाची किंमत नाही, असा संताप यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना ही कायम बळीराजासोबत आहे व या संकटकाळात आम्ही बळीराजाला मजबूत पाठबळ देणार असा विश्वास शेतकऱ्यांना दिला. ”आधी उन्हाचा रखरखाट आणि आता रिमझिम पाऊस. ज्याचा शेतीला काहीच फायदा नाही. या महासंकटात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे. कांदा, टोमॅटोच्या नुकसानाची शासन दरबारी दखलसुद्धा घेतली जात नाही” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.