शिवसेनेचा सूर्य तळपला! ट्विटरवर आदित्य ठाकरे यांचे १ मिलियन फॉलोअर्स

59

सामना ऑनलाईन । मुंबई

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संध्या १ मिलियनपर्यंत पोहोचली आहे. तरुणांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी २०१३मध्ये ट्विटर अकाउंट सुरू केले होते. त्याला तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांच्या फॉलोअर्सची संध्या १ मिलियन म्हणजेच १० लाखांपर्यंत पोहोचली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्रीडा आणि शाळा-कॉलेज संदर्भातील समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्यात आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. ट्विटरसारख्या सोशल मीडिया माध्यमाचा वापर तरुणांच्या समस्या मांडण्यासाठी करण्यात येत असल्याने आदित्य ठाकरे यांना तरुणांकडून मोठ्या प्रमाणात फॉलो केले जात आहे. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्यक्ष आहेत तसेच मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचेही अध्यक्ष आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या