आदित्य ठाकरे यांची संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद, कोणत्या विषयावर बोलणार याकडे साऱ्यांचं लक्षं

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची आज संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेनाभवन येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे हे कोणत्या विषयावर बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

याआधी आदित्य ठाकरे यांनी वेळोवेळी पत्रकार परिषद घेत मिंधे सरकारकडून मुंबईची चाललेली लूट समोर आणली आहे. त्यामुळे मिंधे सरकारचे सारे मनसूबे उघडे पडले आहेत. मुंबई महापालिकेच्या एफडी फोडणे, रस्त्यांच्या कामाचे कंत्राट, उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जाणे अशा महत्त्वाच्या विषयांवर याआधी आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता.