सिंगापूर ओपन बॅडमिंटन: सायना, सिंधू, श्रीकांत, समीर उपांत्यपूर्व फेरीत

48
pv-sindhu-saina-nehwal

सामना ऑनलाईन । सिंगापूर

पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांच्यासह किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा या हिंदुस्थानी खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, मात्र पारुपल्ली कश्यप या हिंदुस्थानी खेळाडूचे आव्हान गुरुवारी संपुष्टात आले.

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट हिचा 21-13, 21-19 असा 39 मिनिटांच्या लढतीत पराभव करून आगेकूच केली. सिंधूचा मियावर हा सलग दुसरा विजय होय. या आधी स्पेन मास्टर्स स्पर्धेतही सिंधूने मियाला हरवले होते. आता सिंधूपुढे चीनच्या काई यानयान हिचे आव्हान असेल. यानयान हिने वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकलेले होते. याच यानयानने मागील महिन्यात इंडिया ओपनच्या उपांत्य लढतीत सिंधूला हरवले होते.

याचबरोबर फुलराणी सायना नेहवाल हिने थायलंडच्या पी. चोचुवाँग हिचा चुरशीच्या लढतीत 21-16, 18-21, 21-19 असा पराभव केला. पुरुष एकेरीत समीर वर्माने जागतिक क्रमवारीत 19व्या स्थानी असलेल्या लू गुआंगजू याचा 21-15, 21-18 असा पराभव केला.

आपली प्रतिक्रिया द्या