केजरीवाल यांना झटका, आपच्या खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

सामना ऑनलाईन । दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर देशात पक्षांतराचे वारे जोरात वाहत आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार हरिंदर सिंग खालसा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका मानला जातो. हरिंदर सिंग खालसा हे पंजाबमधील आम आदमी पक्षाचे फतेहगड साहिबचे खासदार असून, त्यांना पक्षाने निलंबीत केले होते.

हरिंदर सिंग खालसा यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रभावीत होऊन कोणत्याही अटींशिवाय भाजपमध्ये प्रवेश केला आहे”. असे हरिंदर सिंग यांनी पक्ष प्रवेशावेळी म्हटले आहे. हरिंदर सिंग हे 1974 च्या बॅचचे आयएसएफ अधिकारी होते. 1984 च्या शिख विरोधी दंगली विरोधात नोकरी सोडणारे ते एकमेव आयएसएफ अधिकारी आहेत. अशी माहिती अरूण जेटली यांनी दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते फतेहगड साहिब लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते.