आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढेल. काँग्रेससोबत आघाडीची कोणतीची शक्यता नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केली आहे.
पुढच्या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी होणार, अशी चर्चा सुरू होती. पण या चर्चांना अरविंद केजरीवाल यांनी पूर्णविराम दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली. आम आदमी पार्टी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढेल. काँग्रेस सोबत आघाडी करण्याची कुठलीही शक्यता नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीने निवडणुकीसाठी 20 उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर केली आहे. तर तीन आठवड्यांपूर्वी आम आदमी पार्टीने 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.