आमिरच्या ‘लाल सिंह चढ्ढा’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

918

कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर बरेचसे चित्रपट आपल्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये फेरबदल करत आहेत. अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहेत. जे चित्रपट बहुप्रतिक्षित आहेत, त्यांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काही चित्रपटांच्या तारखांविषयी विचार सुरू आहे, तर काहींनी आपल्या तारखा निश्चित केल्या आहेत.

या यादीत अभिनेता आमीर खान याचाही समावेश आहे. आमिर खानची बहुप्रतीक्षित फिल्म ‘लाल सिंह चड्ढा’ आधी 2020 च्या नाताळमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले होते. कारण आमीर खान आणि नाताळचे नाते जुने आहे. नाताळ दरम्यान प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत, ज्यात 3 इडियट्स, पीके, धूम 3, दंगल इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे 2020च्या नाताळच्या मोसमात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचं त्याने ठरवलं होतं. मात्र, कोरोनामुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.


View this post on Instagram

Sat Sri Akaal ji, myself Laal…Laal Singh Chaddha.

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

आता हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2021च्या नाताळात प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गम्पवर आधारित आहे. लॉकडाउनच्या आधी, चंदिगड आणि कोलकातामध्ये चित्रपटाच्या काही भागाचे शूट झाले आहे. जेव्हा देशातली स्थिती अवघड बनली आहे तेव्हा अभिनेत्याने आपल्या चित्रपटाच्या रेकीसाठी तुर्कीमध्ये आहे. जेव्हा निर्मात्यांनी आमिर खानचा शीख व्यक्तिरेखेतील फर्स्ट लुक प्रदर्शित केला होता, तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली होती.

आमीर खानचीच निर्मिती असलेला लाल सिंह चढ्ढा या चित्रपटात आमीरसह करीना कपूर खान ही देखील दिसणार आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री मोना सिंग ही देखील झळकत आहे. अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून अद्वैत चंदन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या