माझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा

82
aamir-khan-thugs-of-hindost

सामना ऑनलाईन । मुंबई

बहुचर्चित ठग्ज ऑफ हिंदोस्तानमधल्या अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख, कतरिना कैफ यांच्या व्यक्तिरेखांवरून पडदा उठवल्यानंतर आज आमीर खानने त्याच्या व्यक्तिरेखेचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या चित्रपटात आमीर खान फिरंगी नावाची भूमिका साकारणार असून ही त्याने आता पर्यंत केलेल्या भूमिकांमधली सर्वात वेगळी भूमिका आहे. त्याच्या लूकमधूनच या भूमिकेचे वेगळेपण दिसून येत आहे.

आमीर खानने इतर कलाकारांचे लूक रिलीज केल्यानंतर चाहते आमीरच्या लूकची आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही आतुरता लक्षात घेत सोमवारी आमीरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा लूक रिलीज केला. या लूकला काही मिनीटातंच हजारो लोकांनी लाईक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या